Wednesday, August 7, 2013

चकाकते सरण


 





निळ्या आभाळात कुणी बांधले तोरण?
काजव्यांच्या उजेडात चकाकते सरण !! धृ !!

पक्षी गेले झोपी अन हलेनाही पान
सटविच्या आवाजाने शहारल रान
मुक्या नदीला रेटून गहिवरते धरण !!१!!

दुख्ख बसत खेटुनी ओठांवरी येई गाणं
आसवात भिजलेया देखणे सपान
ठेच लागता कपाळी भाळभाळते चरण !!२!!

आग भिडे गगनात हुंदका छातीत
सोन्यावाणी देह आता मिसळे मातीत
जगण्याच्या हट्टापायी थरथरते मरण !!३!!

No comments:

Post a Comment