Wednesday, August 7, 2013

वाट पाहते तुझी साजना

या शुष्क डोळंयावर बांधिले अश्रूंचे तोरण
वाट पाहते तुझी साजना किणकिणले कंगन !!ध्रृ !!

आकाशी मी हात उभारून
उंच धरले फुल जपून
ओठांवरली तुझी ती खूण
छळते आता आरसा पाहून
पाहू नको तू अंत आता फुटेल हे धरण !!1!!

उन्हे कोवळी गाणी प्याली
नि:शब्द फुलांची वाणी झाली
मावळतीच्या छटा गुलाबी
येतील पुन्हा माझ्या गाली
कोरूनि ठेवीन काळजावरी नात्यानचे गोंदण !!2!!

खेटुनी जाते मरणही मजला
तुझ्याचसाठी श्‍वास मी भजला
जवळी तू असता जीवही सजला
निबंधाचही होती गजला
साचलेल्या आठवणींचे करू दे पारायण !!3!!

देहाचे मी करूनि अंगण
धुंडिते सारे ते तारांगण
कोमजलेले फुल पाहुनी
जन्मा आले माझेही मरण
ठेवीन सारी दु:खे नि मजला तुझ्याकडे तारण !!4!!

No comments:

Post a Comment