Thursday, August 1, 2013

चेहरा तुझा दिसो


उघडताच मी डोळे, चेहरा तुझा दिसो
जरी मिटले असले तरीही , स्वप्नही तुझे दिसो !!धृ !!

ज्या वाटेवर तुझ्या होत्या पाऊलखुणा
त्या वाटेवर पुन्हा जाऊ दिले ना कुणा
तू आरसा झाली असता, चेहरा माझा नसो !!१!!

चिंब भिजुनी पावसात, उरी जखम सांभाळताना
पाणी पावसाचे आणि , अश्रू नेमके ओळखताना
जन्मोजन्मी कधीही, मी ना असा फसो !!२!!

मी वाट पहिली तुझी, ना लवली पापणी माझी
जी जखम दिली तू ताजी, मी भोगली राजी राजी
तुला नेताना तो यमही, आकाशी गाली हसो !!३!!

मरणाची नाही भीती, ते तर तुझ्याच हाती
जगणे घेउनि येती वांझोटी स्वप्न रिती
पण कफानाच्या जागी ती , ओढणी तुझी असो !!४!!

No comments:

Post a Comment