निधड्या छातीवरती कोरु नव्या युगाची वाणी
हातामध्ये हात गुंफुनी गाऊ मुक्तीची गाणी
आम्ही स्वाभिमानी.....आम्ही स्वाभिमानी !!धृ !!
हातामध्ये हात गुंफुनी गाऊ मुक्तीची गाणी
आम्ही स्वाभिमानी.....आम्ही स्वाभिमानी !!धृ !!
युगायुगाची, अन्यायाची
इतिहासाची वाहुनी ओझी
वेशीबाहेर तिष्टत राहुनी
नागपुत्रांनी साहले पाजी जातीवाद्याना वेसन घालूनी
काळोखाला मागे रेटून
पुढे चालली, निळ्या चित्यांची सेना ही मानी !!१!!
या धरतीवर, आभाळावर
या सत्तेवर, या मत्तेवर
या जगण्यावर, या काळावर
नाव कोरूया चला भाळावरबुद्ध , कबीर अन भीमबाबांच्या
फुले, शाहू ,अन शिवरायांच्या
लखलखनार्या त्या विचारांच्या आता लुटू खाणी !!२!!
नव्या दमाचे, नवे सोबती
नव्या स्वप्नांची, नवी संगती
कडाडणाऱ्या डफलीवरती
थाप पडू दे आसमंती
एक दिलाने , निर्धाराने
युद्ध जिंकण्या समानतेचे
आवाज घुमू द्या चोहबाजुनी बुरुजांच्या कानी !!३!!
- कवी भगवान निळे
No comments:
Post a Comment