Monday, August 26, 2013

असे वाटते की...


 





असे वाटते की मला तू जपावे
मला सोसताना तुला तू जपावे

तुझ्या शुष्क ओठी माझे गीत यावे
मीटुनी तू डोळे मलाही पहावे

खुळ्या आठवांचा सडा कोसळावा
विसरुनी मला तू स्वतःला स्मरावे

मी गावे गोडवे तुझ्या छळाचे
पाहुनी स्वत:ला आरसी लपावे

पुन्हा रात्र यावी चोरपावलांनी
तुला मी भुलावे मला तू गुणावे

फुटावी मीठीतून वाट चांदण्याची
अशा काळोखाला उराशी धरावे

तुझ्या सावलीची तुला वाटे भीती
तुझे वागणे का तुलाही खुपावे?

No comments:

Post a Comment