Tuesday, August 20, 2013

निळ्या वातीच्या उजेडी


उभ्या भरगच्च पिकात कसा येईना ढेकर?
घाम गाळून गाळून मला दिसेना भाकर !
नाही शिकले मी शाळा दुख्ख पाचवीला पूजले
ढकलत सार आयुष्य सुख गर्भात कुजले !

भूक चिकटे पोटाला नाही दाणही चाखाया
आहे फाटक लुगड लाज नागडी राखाया !

देव देवळात बसे आहे का त्याला लाज ?
आम्हा नागड करून तो मढविती साज !

निळ्या वातीच्या उजेडी स्वप्न वटीत बांधते
आटलेल्या थानाला भूख लेकरू लोचते !

धन्यासंग रडताना रात सरता सरेना
उबदार मिठीत पाखरू धरता धरेना !

नाही लावली आम्ही दोन्ही हाताना ती धार
माझी लेकर करतील उद्या गरीबीवर वार !!

No comments:

Post a Comment